#Loksabha2019 #LoksabhaElection<br />आर्णी : लोकशाहीत एक मत अमूल्य आहे. एक मत देशाचे भाग्य घडविते. मतदानाला राष्ट्रीय कर्तव्य मानले जाते. जनजागृतीमुळे मतदानाची टक्केवारी वाढत आहे. आर्णी येथील वधूने आधी मतदान करून नंतर ती बोहल्यावर चढली. पायल रामदास डाहाके (रा. आर्णी), असे विवाहापूर्वी मतदानाचा हक्क बजावणार्या विवाहितेचे नाव आहे.